Ad will apear here
Next
‘पेटीएम’तर्फे व्यापाऱ्यांसाठी ‘इन्स्टंट बँक सेटलमेंट’ सेवा
मुंबई : डिजिटल पेमेंट मंच असलेल्या ‘पेटीएम’ने आपल्या भागीदार व्यापाऱ्यांसाठी ‘इन्स्टंट बँक सेटलमेंट’ सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे व्यापाऱ्यांना आपला दैनिक कॅश फ्लो सुधारून व्यापार वाढवण्यात सहकार्य मिळणार आहे. आपल्या ऑफलाइन दुकानांत ‘पेटीएम’द्वारे पेमेंट स्वीकारणाऱ्या ९.८ दशलक्षपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना या सेवेद्वारे लाभ करून देण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

या विषयी बोलताना ‘पेटीएम’चे सीओओ किरण वासिरेड्डी म्हणाले, ‘व्यापाऱ्यांना त्यांच्या कॅश फ्लोचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि स्वतःच्या आणि व्यापाराच्या रोखीच्या गरजा भागवण्यासाठी रोखीची अत्यंत गरज असते. ही गरज ध्यानात ठेवून आम्ही इन्स्टंट सेटलमेंटचे वैशिष्ट्य दाखल केले ज्यामध्ये व्यापारी जमा आलेली पेमेंट दिवसातील हव्या त्या वेळी रियल टाइम आधारावर आपल्या बँक खात्यात प्राप्त करू शकतात. पेटीएम आता कॅश इतकेच सशक्त असल्याचे या नवीन सुविधेचा लाभ घेतलेल्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.’

ग्राहक पेटीएम क्यूआर स्कॅन करून आणि पेटीएम वॉलेट, भीम युपीआय किंवा बँक खात्यापैकी आपल्या पसंतीच्या पद्धतीने व्यापाऱ्यांना पेमेंट करत आहेत. आता ‘इन्स्टंट बँक सेटलमेंट’च्या रूपाने हे व्यापारी जमा केलेले पेमेंट सेटल करण्यासाठी त्यांच्या पसंतीची वेळ निवडू शकतात किंवा त्यांना हवे तेव्हा थेट त्यांच्या बँक खात्यात तत्काळ सेटलमेंट देखील करू शकतात. ही सोय त्यांना अत्यंत यूझर फ्रेंडली अशा ‘पेटीएमफॉर बिझनेस’ या अॅपवर उपलब्ध आहे ज्यावर व्यापारी आपल्या सर्व पेमेंट्सचा आणि सेटलमेंट्सचा रियल-टाइम आधारावर माग देखील ठेवू शकतात.

कंपनीने भारतभरातील एक दशलक्षपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना ही सुविधा देऊ केली आहे, ज्यात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सध्या आपल्या सर्व ९.८ मिलियन ऑफलाइन ग्राहकांपर्यंत ही सुविधा पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZJTBU
Similar Posts
‘पेटीएम’द्वारे ‘टॅप कार्ड’चा शुभारंभ मुंबई : भारतातील अग्रणी पेमेंट गेटवे ‘पेटीएम’ने आपल्या सेवांचा विस्तार करताना ‘पेटीएम टॅप कार्ड’ या देशातील पहिल्या ऑफलाइन पेमेंट सोल्युशनचा शुभारंभ करून आपल्या सेवांचा विस्तार वाढवला आहे.
‘पेटीएम’चे सोप्या फीचर्ससह अद्ययावत अॅप मुंबई : ग्राहक आणि व्यापाऱ्यांना व्यापक स्वरूपात देयक सुविधा प्रदान करणारे भारतातील अग्रणी पेमेंट गेटवे पेटीएमने अधिक सोयीस्कर आणि युजर फ्रेंडली बनविण्यासाठी अॅपचे पुनर्निर्माण केले आहे. अॅपच्या अद्यतनाद्वारे पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे.
‘पेटीएम’ची रिकरिंग पेमेंट्स सेवा मुंबई : भारतातील सर्वांत मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या ‘पेटीएम’ने आपल्या व्यापार्‍यांसाठी रिकरिंग पेमेंट सेवा सुरू केली आहे. ‘पेटीएम’वर दरमहा ४०० दशलक्षपेक्षा अधिक व्यवहार होतात. हे फीचर जोडून, आपल्या यूझर्सकडून विनासायास पेमेंट गोळा करण्यासाठी सब्स्क्रिप्शन आधारित व्यवसायांना सुसज्ज करण्याचे कंपनीचे ध्येय आहे
‘पेटीएम’तर्फे ‘पेमेंट फेस्टिव्हल’ची घोषणा मुंबई : ‘पेटीएम’ या भारतातील डिजिटल पेमेंट मंचातर्फे ‘पेटीएम कॅशबॅक डेज’ या सर्वांत मोठ्या पेमेंट फेस्टिव्हलची घोषणा करण्यात आली असून, याचा लाभ १६ डिसेंबर २०१८पर्यंत घेता येणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language